अमळनेर । सतत नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अग्रेसर असणार्या शहराचे आमदार शिरीष चौधरी यांनी शहरातील शेख जोबिया वसीम यांना उपचारासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केलेल्या 1 लाखांची मदत मिळाली आहे. अमळनेर येथील रहिवासी असलेल्या शेख जोबिया वसीम यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने आ. शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी अशी शिफारस केली होती.
त्यानुसार शेख जोबिया वसीम यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाखांची मदत देण्यात आली आहे. तसा यु टी आर देखील फोर्टीर्स हॉस्पिटल्स मुंबई यांच्या नावे पाठविण्यात आला आहे. आर्थिक सहाय्यता मिळाल्याने शेख वसीम शेख कासम यांनी आमदार शिरीष चौधरींचे आभार मानले आहे. यावेळी प्रवीण पाठक गटनेते, श्रीराम चौधरी, किरण बागुल, पंकज चौधरी, शेख वसीम शेख कासम, सुनील भामरे, किरण सावंत, सुरेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.