शहादा । शहरातील एका युवकाचा गेल्या पावसाळ्यात लळींग तलावात बुडून मृत्यू झाला. त्याच्या वारसांना मुख्यमंञी सहाय्यता निधीतून एक लाख रूपयाचा धनादेश आ.उदेसिंग पाडवी यांचे हस्ते देण्यात आला.महालक्ष्मी नगकातील नाना इंदवे यांचा तरून मुलगा मच्छिंद्र नाना इंदवे (22) हा गेल्या वर्षी धुळे तालुक्यातील लळीग गौंड बंदला येथे कार्यक्रमास गेला होता. त्या वेळेस पाऊस जास्त झाला.तेथे लळींग तलाव पाण्याने भरला होता. तेथे मच्छिंद्र मिञांसह आघोळीस गेला होता त्यावेळी त्याचा मृत्यू ओढावला होता.
आ.पाडवी यांनी केला पाठपुरावा
मृत्यूच्या कुटुबांना मुख्यमंत्री सहीय्यता निधी मिळावा या करीता आ.पाडवी यांनी पाठपुरावा केला होता आज तहसिलदार कार्यालयत मृत्यू मच्छिंद्र च्या वारस आई ललीताबाई व वडील नाना इंदवे यांना एक लाख चा धनादेश आ. पाडवी याच्या हस्ते देण्यात आला. यावेळी तहसिलदार मनोज खैरनार, नायब तहसिलदार डॉ.उल्हास देवरे, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ किशोर पाटील, जिल्हा सरचिटनिस दिनेश खंडेलवाल, नगरसेवीका रीमा पवार, के.एम.पवार, जयेश देसाई मनोज चौधरी. हितेंद्र वर्मा हेमराज पवार. नजमोद्दीन खाटीक. बंटी धोबी पियुष चोरडीया. महेश पाटील. व पंकज सोनार उपस्थित होते.