30 डिसेंबरचा मुहूर्त ; आमदार संजय सावकारे यांची माहिती
भुसावळ: केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या अटल योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते मात्र कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे त्यांच्या ऐवजी शनिवार, 30 डिसेंबर रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन होईल, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. या योजनेतून पहिल्या टप्प्यातील जलशुध्दीकरण केंद्र, पाईप लाईन व जलकुंभ कामाचे भूमिपूजन केले जात आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामास प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जलशुद्धीकरण केंद्रातील योजनेच्या नियोजित जागेची पाहणी करण्यात आल्याचे सावकारे यांनी सांगितले. अमृत योजनेतून नवीन जलशुध्दीकरण केंद्र, 11 ठिकाणी जलकुंभ व 213 किलोमीटर अंतराची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. एमजीपीकडून तापी नदीपात्रातील पाण्याचे सर्वेक्षण करून नमूनेदेखील घेण्यात आले आहेत तर योजनेच्या जागेवरील झाडे तोडून परीसर मोकळादेखील करण्यात आला आहे.