धुळे । अनेक वर्षापासून मागासलेल्या धुळे जिल्ह्याचा खरा विकास मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे. अक्कलपाडा धरण, नरडाना एमआयडीसी, मनमाड इंदूर रेल्वे मार्ग असे मोठमोठे प्रकल्प मुख्यमंत्री व राज्यसरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याचप्रमाणे डॉ. राहुल भामरे यांचा खान्देश कॅन्सर सेंटर संकल्प म्हणजे खान्देशवासीयांसाठी एक विकासच असल्याचे प्रतिपादन रोहयो व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल यांनी केले.
खान्देश कॅन्सर सेंटर खान्देशवासीयांना उपयोगी-डॉ. भामरे
खान्देशच्या रुग्णाला खान्देशातच कॅन्सरवर उपचार उपलब्ध करून देण्याची संकल्पना होती, त्यामुळे धुळे येथे खान्देश कॅन्सर सेंटर उभारण्याची योजना आखण्यात आली असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. भामरे सरंक्षण राज्यमंत्री यांनी कार्यक्रम प्रसंगी केले. डॉ. राहुल भामरे यांनी कोरिया कॅन्सर सेंटर येथून व जर्मनी येथून प्रक्षिषण घेतले आहे. खान्देश कॅन्सर सेंटरची संकल्पना डॉ.राहुलचीच असल्याचे डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कॅन्सर सेन्टरचे उद्घाटन
येथील खान्देश कॅन्सर सेंटरच्या भूमीपूजनचा कार्यक्रम सोमवार 25 डिसेंबर रोजी सकाळी 11.45 ला मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडला. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजनयांच्या प्रमुख उपस्थिती होती.