सोलापूर: परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागांची पाहणी मुख्यमंत्री करत आहेत. पाहणी दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०१५ च्या शासन निर्णयानुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली आहे. मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुपूर्द केले आहे.
पावसामुळे घराचे नुकसान झालेल्यांना ९५१०० रुपयांची तर बैल जोडी दगावल्याने २५ हजाराची मदत दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील रामपूर गावातील शेतकऱ्यांना ही मदत दिली आहे. आज दुपारी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. यात ते काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे.