मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द ; अन्य मंत्र्यांच्या हस्ते होणार दीपनगर प्रकल्पाचे उद्घाटन

0

भुसावळ :- दीपनगरातील नियोजित 660 प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन होणार होते मात्र मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा अचानक रद्द झाल्यामुळे अन्य मंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे आता थोड्याच वेळात भूमिपूजन होणार आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, प ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जळगाव जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकारे, हरिभाऊ जावळे आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले.