मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान

0

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कुंटुंबीयांसह मंत्रीमंडळही यावेळी हजर होते.

या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार सरदार तारासिंह हे उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या.