मुख्यमंत्र्यांची आज धुळ्यात सभा !

0

अमरीश पटेल करणार भाजपात प्रवेश !

धुळे: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र प्रचाराचा नारळ फुटला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे येथे प्रचारसभा घेणार आहे. नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले आमदार काशीराम पावरा यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. दुपारी १.३० वाजता सभेला सुरुवात होणार आहे. दरम्यान या वेळी धुळ्यातील मोठी राजकीय हस्ती म्हणून ओळख असलेले अमरीश पटेल भाजपात प्रवेश करणार आहे. विधानसभेसाठी प्रचाराचा नारळ फुटले आहे, मात्र अद्यापही भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे.

काल शरद पवार यांनी पारोळ्यात प्रचार सभा घेतली. आता १३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात सभा होणार आहे.