पिंपरी-चिंचवड । बैलगाडा शर्यतीला मंजुरी मिळाल्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिकेच्या विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी शनिवारी शहरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडा मालकांनी सजविलेल्या बैलगाडीत बसवून स्वागत केले. यावेळी बैलगाडी हाकण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना आवरता आला नाही.