मुख्यमंत्र्यांच्या अलिबागच्या संभाव्य दुर्घटनेची चौकशी?

0

मुंबई – अलिबागमध्ये संभाव्य हेलिकॉप्टर दुर्घटनेत बचावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कथित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

शुक्रवारी अलिबागमधला जाहीर कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री फडणवीस तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टरचा पंखा फिरू लागला व हेलिकॉप्टर दीड ते दोन फूट वर उडाल्याचे समजते. यावेळी सुरक्षारक्षकांच्या सावधतेमुळे तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधनामुळे त्यांनी १० ते १५ फूट दूर पळ काढला. या दुर्घटनेत त्यांना हेलिकॉप्टरचा पंखा लागण्याची शक्यता होती. या घटनेनंतर हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत परतले. हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी बसल्यानंतर दरवाजे बंद झाल्यावर हेलिकॉप्टर सुरू केले जाते. मग ते आधीच कसे सुरू झाले. यात चालकाचा हलगर्जीपणा होता की काही तांत्रिक बिघाड होता, याची चौकशी केली जाणार असल्याचे कळते.