मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर फुरसुंगी ग्रामस्थांचे आंदोलन मागे

0

पुणे :  गेले 23 दिवस चर्चेत असणारा पुणे शहराचा कचरा प्रश्न अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर सुटला आहे. उरुळी आणि फुरसुंगी येथे पुणे शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येते. मात्र तेथील नागरिकांनी या भागात कचरा टाकण्यास विरोध दर्शवला होता. इतकेच नव्हे तर गेले 23 दिवस विविध प्रकारे अभिनव आंदोलने करून त्यांनी कचर्‍याची गाडी गावात येऊ दिली नाही. या काळात महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणालकुमार यांच्यासह प्रशासनाने केलेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. अखेर खुद्द मुख्यमंत्र्यांनी आगामी महिन्याभरात या प्रश्नाचा सुधारित आराखडा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले आहे. हा प्रश्न गंभीर झाला असताना महापौर आणि पालकमंत्री गिरीश बापट परदेश दौर्‍यावर गेल्यामुळे भाजपवर विरोधकांनी टीका केली होती.