मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ

0

परभणी : परभणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गुरुवारी विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे व स्वाभिमानीच्या विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षा शर्मिला येवले या महिलांमधून उठून मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावत गेल्या असता पोलिसांनी त्यांना रोखले.

राज्यामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. यावर तुम्ही काहीच करीत नाही. शेतकरी स्वत:हून सरण रचून आत्महत्या करीत आहेत, तुम्ही मात्र इकडे उद्घाटन करत फिरत आहात, तुम्हाला काही तरी वाटायला पाहिजे, शेतकर्‍यांना बोंडअळीचे अनुदान मिळालेले नाही, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अत्यल्प पीक विमा मिळाला, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्या, असे या महिला पदाधिकारी मुख्यमंत्र्यांकडे पाहून त्वेषाने बोलत होत्या.