मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध, भुसावळात मूक मोर्चा

0

नाभिक समाजाने दुकाने बंद ठेवून केला निषेध

भुसावळ: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ नाभिक समाज भुसावळ कार्यकारीणी मंडळातर्फे शनिवारी अष्टभूजा मंदिर ते प्रांताधिकारी कार्यालयादरम्यान मूक मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी प्रशासनाला देण्यात आले. अध्यक्ष दत्तू खोंडे, सदस्य रवी सावखेडकर, डी.एस.चौधरी, सचिन सोनवणे, संदीप संनांसे यांच्यासह नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. शनिवारी शहरातील सर्व नाभिक समाजबांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.