भुसावळ । पुणे जिल्ह्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्राच्रा गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रासह भुसावळ विभागात शनिवारीदेखील उमटले. भुसावळात दुकाने बंद ठेवून व मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला तर यावलसह बोदवडदेखील निषेधार्थ निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
भुसावळात मूकमोर्चा काढून निषेध
नाभिक समाज भुसावळ कार्यकारीणी मंडळातर्फे शनिवारी अष्टभूजा मंदिर ते प्रांताधिकारी कार्यालयादरम्यान मूक मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी प्रशासनाला देण्यात आले. अध्यक्ष दत्तू खोंडे, उपाध्यक्ष दिलीप लोंढे, सचिव रवीशंकर सावखेडकर, खजिनदार पंडीत संनसे, सचिन सोनवणे, डी.एस.चौधरी, अभर सुर्रवंशी, अवधूत महाले, संजू बोरसे, विनारक वाघ, बापू निकम, भास्कर बाणाईत, विकी पगारे, किरण तुपे, भिका बाणाईत, प्रशांत खोंडे, विजर चौधरी, विनोद आंबेकर, नरेंद्र महाले, दीपक सूर्यवंशी, हर्षल सैंदाणे, उदर सोनवणे, आबा निकम, विजर कन्हैय्रे, शिवदास महाले, विदीश अहिरे, विजर ठाकरे, प्रकाश खंबारत, मधू चौधरी, आप्पा अहिरे, नाना चित्ते, हेमंत संनसे, धनराज संनसे, गणेश महाले, बॉबी संनसे आदी समाजबांधव सहभागी झाले. शनिवारी शहरातील सर्व नाभिक समाजबांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
बोदवडला दुकाने बंद
बोदवड – शहर व तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध दुकाने बंद ठेवून निषेध करण्यात आला तर शनिवारी दुपारी 12 वाजता बोदवड तहसील कार्यालयात नायब तहसीलदार बी.डी.वाडीले यांना निवेदन देण्यात आले. समाजाचे तालुका उपाध्यक्ष आमोल अमोदकर, सचिव संजर बिंडके, सोपान महाले, हरिभाऊ सुंरनसे, संजर वाघ, विवेक वखरे, अनिल कळमकार, सतीश कुंवर, प्रकाश सोनवणे, प्रीतम वर्मा, अरुण सोनवणे, गणेश सोनवणे, निवास बाभूळकर, राजु बाभुळकर, गोपाल वखरे यांच्यासह नाभिक समाजबांधवांच्या उपस्थितीत निषेध नोंदवण्यात आला.
यावलला तहसीलदारांना निवेदन
यावल – राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशोभनीय वक्तव्य केल्याने त्याचा निषेध करण्यात आला. यावलच्या श्री जिवा महाले नाभिक बहुउद्देशिर संस्थेच्या वतीने तालुक्यातील सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीत तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना संस्थाध्यक्ष अनिल चौधरी, सुपडू वारूळकर, राहूल सावखेडकर, भागवत सावखेडकर, अशोक येवले, सुभाष वारूळकर व समाजबांधव उपस्थित होते.
मुक्ताईनगर नाभिक समाजातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी
मुक्ताईनगर – तालुक्यातील नाभिक समाजातर्फे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याची निषेधार्थ दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार रचना पवार-पाटील रांना देण्यात आले. निवेदनावर नाभिक समाज तालुकाध्यक्ष सुभाष सनांसे, शहराध्यक्ष नितीन चव्हाण, विजर टोंगे, मनोहर सनांसे , सुनील श्रीखंडे, हेमंत टोंगे, निलेश मालवेकर, कमलेश वाघ, स्वप्निल श्रीखंडे, निलेश वाघ, संजर टोंगळे तसेच अंतुर्ली येथील बंडू सूर्यवंशी, महेंद्र आमोदे, ज्ञानेश्वर देवरे, सुधाकर सनांसे, मुकेश महाले, देविदास मानकरे, रघुवीर टोंगळे आदींसह असंख्य समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.