मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाभिक समाजाचा मूक मोर्चा

0

शिरूर । दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून शहरातून मूक मोर्चा काढून शिरूर शहर व तालुका नाभिक संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला व नायब तहसिलदार अशोक पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाऊसाहेब क्षीरसागर, रणजीत गायकवाड, गणेश शिंदे, गणपत क्षीरसागर, गोरख गायकवाड, विलास रायकर, सनी थोरात, मधुकर वाघमारे, सुरेंद्र वाघमारे, निलेश भोसले, संतोष गायकवाड, सोमनाथ देव्हाडे, आजाद शेख, अली शेख, अजय गायकवाड, मधुकर शिंदे, संदीप वाघमारे, निलेश गायकवाड, नंदू घायतडक, बबन वाघमारे, अनिल रायकर, शशिकांत गायकवाड, गणेश शिंदे, मच्छिंद्र घायतडक, निलेश शिंदे, राहुल शिंदे, स्वप्नील शिंदे, गोरक्ष शिंदे, नवनाथ शिंदे, रामदास क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, बबन रायकर, राजेंद्र आतकर, एकनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

नाभिक समाजाच्यावतीने शनिवार (दि.18) दुकाने बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढून तहसिलदार यांना निवेदन दिले. दौंड तालुक्यातील पाटस येथे भिमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ‘एक न्हावी चार-पाच गिर्‍हाईक असल्यानंतर अर्धी-अर्धी हजामत करून त्यांना बसवून ठेवतो,’ असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखवल्या असून ते त्यांनी सिद्ध करून दाखवल्यास समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करू अन्यथा त्यांनी सकल नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी. तसे न झाल्यास येथून पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.