मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी शास्तीकराचे गाजर

0

एकनाथ पवारांच्या आश्‍वासनावर दत्ता सानेंची टीका

पिंपरी चिंचवड : निगडीमध्ये दि. 3 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा शहरवासीयांना शास्तीकर माफीचे गाजर दिले आहे, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. शहरातील 600 चौरस फुट आकाराच्या निवासी बांधकामधारकांना शास्तीकर माफी आणि 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या बांधकामांना 50 टक्के शास्तीकर अशी सवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाणार आहे. दिवाळीनंतर संगणक प्रणालीमध्ये बदल केल्यानंतर 15 दिवसात या कामाचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार असल्याचे भाजपाचे शहरातील नेते एकनाथ पवार यांनी जाहीर केले आहे. त्यावर लबाड लांगड ढोंग करतय शास्तीकर माफीच सोंग करतय, अशी काहीशी म्हण साने यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे लागू केली आहे.

सत्ताधार्‍यांमध्ये अंमलबजावणीची क्षमता नाही…
त्यांनी म्हटले आहे की, वस्तुतः शहरातील नागरिकांची जाचक असलेल्या शास्ती करापासून सुटका होण्यासाठी संपूर्ण शास्तीकर माफ होण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्वीपासून आग्रही आहे. त्या अनुषंगाने महापालिकेत ठराव करण्यात आले आहे. परंतु, सत्ता बदलामुळे या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्यक्षात शासन निर्णयामध्ये प्रत्यक्ष महानगरपालिकेने शास्तीबाबत स्वतः निर्णय घ्यावा, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, भाजपचा नाकर्तेपणा आणि पदाधिकार्‍यांमुळे शास्तीकराचा राक्षस नागरिकांच्या मानगुटीवर अजूनही बसलेला आहे.

अजून किती दिवस जनतेला फसविणार…
शास्तीकर सवलतीचा लाभ 50 हजार कुुटुंबांना मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, प्रत्यक्ष 600 चौरस फुट व 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराची निवासी बांधकामाची संख्या 25 हजारापेक्षा जास्त नाही. म्हणजेच या शास्तीकराचा फायदा शहरातील 2 टक्के नागरीकांनाही फायदा झालेला नाही. भाजपाचे सरकार आश्‍वासनांची नुसती गाजरे दाखवित आहेत. प्रत्यक्षात नागरिकांच्या हाती काही येत नाही. भाजप सरकारचे पारदर्शी कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील नागरीकांनाही आता कळू चुकले आहे की, भाजपाचा नुसता बोलाचाच भात बोलाचीच कढी आहे. अजून किती दिवस जनतेची फसवणुक करणार, असा सवाल देखील साने यांनी उपस्थित केला आहे. भाजपाच्या नेत्यांनी आता दिलेले आश्‍वासन हे केवळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी गोळा करण्याचे काट कारस्थान असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

काय म्हणाले होते एकनाथ पवार…
राज्र शासनाने महापालिका अधिनिरम कलम 267 ‘अ’मध्रे दुरूस्ती केली आहे. त्राची अंमलबजावणी 4 जानेवारी 2008 पासून करण्रात आली आहे. ही कारदा दुरूस्ती 10 ऑगस्ट 2018 ला राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्रानुसार पालिकेच्रा करसंकलन विभागाने कार्रवाहीस प्रारंभ केला आहे. रा निरमानुसार 600 चौरस फुट आकाराच्रा निवासी बांधकामांना पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफ करण्रात आला आहे. तर, 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्रा निवासी बांधकामांना 50 टक्के शास्तीकर आकारण्रात रेणार आहे. तर, 1 हजार 1 चौरस फुटांपुढील निवासी व सर्व प्रकारच्रा बिगरनिवासी बांधकामांना पूर्वीप्रमाणे 200 टक्के शास्तीकर असणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 600 चौरस फुट आकाराच्रा निवासी बांधकामधारकांना शास्तीकर माफी आणि 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्रा बांधकामांना 50 टक्के शास्तीकर अशी सवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाणार आहे. त्रानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्रा कर संकलन विभागाच्रा संगणक प्रणालीमध्रे बदल करण्राचे काम सुरू झाले आहे. रेत्रा 15 दिवसांत हे काम पुर्ण होऊन नागरिकांना दिवाळीनंतर शास्तीकर सवलतीचा प्रत्रक्ष लाभ मिळणार आहे.

भाजपाच्या महासंमेलनाला येणार मुख्यमंत्री…
भाजपच्रावतीने प्राधिकरण रेथील मदनलाल धिंग्रा मैदानात 3 नोव्हेंबर रोजी अटल संकल्प महासंमेलनाचे आरोजन करण्रात आले आहे. मात्र शहरातील क्रिडा मैदानांवर राजकीर पक्षाचा कार्रक्रम घेण्रास निर्बंध घालण्राचा ठराव महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केला असल्राचे सांगत भाजपाचे कार्रकर्ते सचिन काळभोर रांनी थेट ‘आपलं सरकार’च्रा वेब पोर्टलवर रा जागेवर मुख्रमंत्र्रांनी सभा घेऊ नरे, अशी तक्रार केली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने रांनी धिंग्रा मैदानावर सभेस परवानगी देऊ नरे, अशा मागणीचे पत्र महापालिका आरुक्तांना दिल्राने मुख्रमंत्र्रांच्रा रा सभेच्रा जागेवरून चांगलाच ‘वादंग’ निर्माण झाला आहे.