मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘कमल संवाद’ मार्गदर्शिकेचे प्रकाशन

0

जळगाव। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून प्रदेश सचिव अ‍ॅड. शहेबाज शेख(जळगाव) यांनी प्रकाशित केलेल्या ‘कमल संवाद’ मार्गदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महसुल तथा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस हाजी एजाज देशमुख, कमाल संवाद मार्गदर्शिकेचे संयोजक तथा प्रदेश सचिव अ‍ॅड. शहेबाज शेख उपस्थित होते.

जनसंघ ते भाजपा प्रवास उलगडला
कमल संवाद मार्गदर्शिकेत अल्पसंख्याक विकास विभागाची सविस्तर माहिती, अल्पसंख्यांक समाजासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, भारतीय जनता पार्टीचा जनसंघ ते भाजपा असा ऐतिहासिक प्रवास यासोबत भाजपाचे आमदार, खासदार, प्रदेश कार्यकारीणी, शहर व जिल्हाध्यक्ष, संपूर्ण मंत्रिमंडळाचे नावे व दुरध्वनी क्रमांक पत्यासह देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना कमल संवाद मार्गदर्शिका वाटप करण्यात येणार असल्याचे जमाल सिद्दीकी, अ‍ॅड. शहेबाज शेख यांनी कळविले आहे.