Nathabhau clearly said : First, the ministerial board stopped expanding, now he is not giving the post of guardian minister because the government will collapse anytime! जळगाव : आधी मंत्रीमंडळ विस्तार थांबवण्यात आला तर आता पालकमंत्री देखील जिल्ह्याला नाही याचे कारण स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्यांना सत्ता जाण्याची भीती असून सरकार कोसळणार असल्याची टिका राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगावात माध्यमांसमोर बोलताना केली.
सर्व विरोधक एकत्र येवूनही मला संपवू शकत नाही
आपल्या आक्रमक शैलीत एकनाथराव खडसे म्हणलो की, खडसेंवर टीका केल्याशिवाय जळगावात विरोधकांना कधीही नागरीकांना लक्ष वेधता आलेले नाहीच त्यामुळे तब्बल 40 वर्षांपासून माझ्या विरोधात विरोधक मोट बांधून एकत्र जमले मात्र ते विरोध एकत्र झाले तरी जळगाव जिल्ह्यातल्या नागरीकांचे प्रेम माझ्याकडे असल्याने विरोधक एकत्र येवूनही आपल्याला संपवू शकत नाही.
घोषणेनंतरही सरकारकडून मदत नाहीच
राज्यातील शेतकर्यांवर अतिवृष्टीच संकट कोसळल्याने या संकटातून शेतकर्यांना मुक्त करण्याची प्रार्थना संत मुक्ताईकडे केल्याचे खडसे यांनी सांगितले. सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत करण्याची घोषणा केल्यानंतरही मदत अद्यापही शेतकर्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अशा शेतकर्यांना अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने लवकरात लवकर मदत करावी. अशी विनंती सरकारला करणार असल्याचे त्यांनी जळगावात सांगितले.