मुख्यमंत्र्यांनी ते विधान करायला नको होते: उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर नाराजी

0

मुंबई: आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांशी चर्चा केली. या चर्चेवेळी उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या दिवशी माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना केलेल्या विधानावर आक्षेप घेतले. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ५०-५० चा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसून पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार आहे असे विधान केले होते. याविधानावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे विधान करायला नको होते असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावरून अद्याप तरी शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला नसल्याचे दिसून येते.

आम्ही मित्र पक्षाला शत्रू पक्ष मानत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सांगत आम्ही स्थिर सरकार देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. अमित शहा यांच्यासमोर फॉर्म्युला ठरला आहे असे असताना मुख्यमंत्र्यांनी ५०-५० चा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसल्याचे सांगितले आहे. हे विधान उद्धव ठाकरे यांना खटकेल आहे.