मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पावरून धमकावू नये

0
कोल्हापूर : सध्या नाणार प्रकल्पावरून वाद-विवाद सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाणार प्रकल्पावरून धमकावू नये, असा सल्ला दिला आहे. नाणार प्रकल्पावरून सुरू असलेले राजकारण योग्य नसल्याचे देखील शरद पवार म्हणालेत. मुख्यमंत्री यांनी कोकणात नाही जमीन मिळाली, तर प्रकल्प गुजरातला जाईल असे म्हणाले होते. राज्यात नाणार प्रकल्पाची गुंतवणूक हि एक लाख कोटी रुपयांची आहे. हा प्रकल्प केंद्राचा महत्त्वाकांक्षी असून तो महाराष्ट्रातून बाहेर जाता कामा नये, अशी प्रतिक्रिया पवारांनी व्यक्त केली आहे.
पवार म्हणाले की, गुजरातला किंवा अन्य राज्यात हा प्रकल्प गेला तरी तो देशातच आहे. कोकणातील जनतेचे किंवा त्या प्रदेशाचे हा प्रकल्प झाल्यावर अहित होणार असेल तर त्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. हा प्रकल्प नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी 10 मे रोजी मी प्रकल्पस्थळास भेट देणार आहे. पण तिथे सभा वगैरे घेणार नसल्याचे देखील ते म्हणाले. नाणार प्रकल्पाच्या विरोध कोकणातील राजकीय नेते करीत आहेत. नाणार इथे तेल काढण्याचा मोठा प्रकल्प आणण्याचा सरकारचे प्रयत्न चालू आहे, असे हि म्हणाले होते.
मात्र, या नाणार प्रकल्पाला सत्तेतील शिवसेना तसेच नारायण राणे हे विरोध करीत आहेत. परंतु या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचं, मासेमारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा दिला होता.
असा असेल हा प्रकल्प
  • मुख्य तेल शुद्धीकरण कारखाना बाभुळवाडीत १४ हजार एकरावर.
  • तेथून १५ किमी अंतरावर एक हजार एकर जागेवर तेलाच्या टाक्या व बंदर सुविधा.
  • एकूण अपेक्षित खर्च तीन अब्ज रुपये.
  • वाषिक क्षमता- ६० दशलक्ष टन तेल शुद्धिकरण व १८ दशलक्ष टन पेट्रो उत्पादने.
  • अपेक्षित उभारणी सन २०२५ पर्यंत.