मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तरुणाला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबई न्यायालयाने तरुणाला पोलीस कोठडीत पाठविण्याचा निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियात सुमित ठक्कर या तरुणाने आक्षेपार्ह विधान केले होते. पोलिसांनी या तरुणाला २४ ऑक्टोंबरला अटक केली होती. अटक केल्यानंतर तरुणाला कोर्टात हजर केले असता, ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एएनआयने ही माहिती दिली आहे.