मुंबई | ‘मी मुंबई अभियान-अभिमान’ आणि श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या विद्यमाने ‘नमो युवारोजगार केंद्रा’च्या शेतकरी फिरत्या बाजाराचा शुभारंभ तसेच त्याच्या अॅपचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई महानगरपालिकेतील गटनेते मनोज कोटक, माथाडी कामगार नेते व आमदार नरेंद्र पाटील आणि श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचे नरेंद्र पवार आदी उपस्थित होते. शेतकरी फिरत्या बाजाराची योजना ‘मी मुंबई अभियान-अभिमान’चे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून युवा बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविली जात आहे.
‘नमो युवारोजगार केंद्रा’चा शुभारंभा प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले कि ‘पूर्वी शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संपर्क नसल्यामुळे शेतकरी यांच्या मालाला चांगला भाव मिळत नव्हता. तसेच ग्राहकाला पण चांगल्या दर्जाचा व स्वस्त भाजीपाला मिळत नव्हता. माझे मित्र प्रसाद लाड यांनी गेल्या वर्षी सुरु केलेल्या आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट पैसे मिळायला लागले व लोकांना चांगली भाजी मिळायला लागली. आठवडी बाजार यशस्वी झाला याचा शेतकऱ्यांचा पण फायदा झाला. प्रसाद लाड यांनी सुरु केलेल्या शेतकरी फिरता
बाजार मुंबई नव्हे तर महाराष्ट्रमध्ये प्रत्येक शहरात सुरु झाला पाहिजे. ‘नमो युवारोजगार केंद्रा’च्या एका गाडीमुळे किमान चार लोकांना रोजगार प्राप्त होईल. तसेच आईचा डबाच्या माध्यमातून महिलांना रोजगार प्राप्त होईल. लाड यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात नमो युवारोजगार केंद्रा’च्या ५०० गाड्या नाही तर ५००० गाड्या उभ्या राहिल्या पाहिजेत. भाजी व फळे यांचे स्टोरेज करण्यासाठी शेतकऱ्यांना जागा लागते आणि पायाभूत सुविधा पण लागतात. बंद पडलेल्या महाराष्ट्र कृषि आणि फळ प्रकिया महामंडळ (मॅपको) पुनः जिवंत करून मी मुंबई अभियान-अभिमान’ आणि मॅपको यामध्ये सामंजस्य कराराचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी फिरत्या बाजाराचा शुभारंभाच्या वेळी व्यक्त केला. मॅपकोमध्ये सर्व पायाभूत पहिल्यापासून उपलब्ध आहेत. मॅपको सुरु झाल्याने बेरोजगारांना नोकऱ्यापण उपलब्ध होतील. त्याचा फायदा शेतकऱ्यांना व बेरोजगारांना सुद्धा होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. एका राजकीय नेत्याने मनात आणले तर ते काहीही करू शकतात, हे प्रसाद लाड यांनी दाखवून दिले आहे. ते आपला उद्योग सांभाळून समाजासाठी चांगले कार्य करीत आहेत. ‘नमो युवारोजगार केंद्रा’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार देण्याचा लाड यांनी प्रयत्न करावा.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रसाद लाड यांच्या चालता फिरता शेतकरी बाजार तसेच अभिनव अशी ‘आईचा डब्बा’ या संकल्पनासाठी त्यांचे अभिनंद केले. ते म्हणाले कि ‘काही राजकीय लोक पुत्रोदयासाठी काम करणारे आहेत. पण आमचे सरकार हे समाजासाठी चांगल्या मनाने काम करत आहे. १२५ गाड्या घेऊन आम्ही मुंबईकरांच्या सेवेत आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्याचे भल होणार आहे, व ग्राहकाला त्याचा उपयोग होणार आहे. आईचा डबाच्या माध्यमातून मुंबईकरांना घरचे जेवण खायला मिळणार आहे. हा शिववड्याला पर्याय दिला असेल असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी तसे समजावे’ असा चिमटा यावेळी शेलार यांनी शिवसेनेला काढला.
त्यापूर्वी ‘मी मुंबई अभियान-अभिमान’चे अध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले की ‘नमो रोजगार केंद्रांची संकल्पना मी मुख्यमंत्र्यांना अर्पण करतो. राजकारणा पलीकडे जाऊन समजासाठी चांगलं उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेतकऱ्यांना आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या गरिबांना ही योजना फायदेशीर आहे. विविध बचत गट स्वतः येऊन भाजी विकणार आहेत. भाजी ताजी आणि त्याची किंमत कमी आहे. बेरोजगाराना रोजगार द्यावा. शेतकरी, बेरोजगार आणि महिला एकत्र येतील. आम्ही कोणाशी स्पर्धा करत नाही. शेतकर्यांना मुंबईत बाजारपेठ सुरू करून दिली आहे. मुंबईत यापूर्वी ३० आठवडी बाजार लावायचो ते आता ३७ आठवडी बाजार भरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईत आम्ही १२५ गाड्या लावणार आहोत. त्यापैकी १०८ गाड्या ह्या शेतकरी फिरता बाजारासाठी दिल्या जातील. व १० गाड्या या आईच्या डब्बासाठी वापरणार आहोत व बाकीच्या गाड्या या पतंजलीसाठी वापरल्या जातील. आईचा डबाच्या माध्यमातून मुंबईकरांना घरच जेवण जेवायला मिळणार आहे. तसेच या निमित्ताने महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे. मुंबईतील ५० महिला उद्योग गटांना याचा फायदा होणार आहे. मुंबई नंतर २५ गाड्या नागपूरमध्ये सुरु करण्याचा आमचा मानस आहे. १६ जिल्ह्यामध्ये ४०० बचत गट तयार केले आहेत. त्याच्या माध्यमातून मुंबईत विक्रीसाठी ताज्या भाज्या येणार आहेत. पुढील काळात महाराष्ट्रात ५०० गाड्या उभ्या करण्याचे आमचे लक्ष्य आहे. असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.