जळगाव । जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी शालेय आपत्ती व्यवस्थापनसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण हे विद्यार्थ्याच्या प्रत्येक कुुटुंबाशी निगडीत असल्याने सर्व मुख्याध्यापकांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. महत्तवाचे दुरध्वनी, शाळा व परिसरातील संभाव्य धोक्यांची सूची, विविध नकाशे, प्रमाणित कार्यपध्दती परिस्थितीबद्दल पुणे येथील तज्ञप्रशिक्षक मिलींद वैद्य यांनी मार्गदशृन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, एस.टी.वराडे, जे.के.पाटील, एन.पी.रावळ, किशोर वायकाळे, सी.डी.पाटील, मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक एन.पी.रावळ यांनी केले. सुत्रसंचाल एस.एम.खंबायत यांनी तर आभार सी.डी.पाटील यांनी केले.