भडगाव । रा.स.शि.प्र.म.ली चाळीसगाव संचलीत माध्यमिक शाळाचे मुख्याध्यापक एस.जी मोरे हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमिवर माध्यमिक शाळा गौडगाव मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. वाडे येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचे मुख्याध्यापक एफ.एस.तडवी, ओ.पी.जाधव, आर.एस.देशमुख, एस.आर.खाटीक, एस.डी.चौधरी, एस.वाय.पाटील, पी.व्ही.जाधव, सी.एस..सोंनिस, पी.व्ही.चव्हाण, व्ही.ए.पाटील, जे.जी.भोसले, डी.जे सावळे, एल.एस.पाटील, एस.आर.महाजन, बी.आर.साळुंखे, बी.एस.वाडेकर, टी.ए.घुले, एस.जी.भोपे, एस.एम.परदेशी, व्ही.एम जाधव, एस.एल.मोरे आदी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार बी आर साळुंखे यांनी केले .