जामनेर । येथील न्यु इंग्लीश स्कुलच्या एका संचालकासह मुख्याध्यापकावर शाळेतीलच उपमुख्याध्यापक यांना जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर असे की, न्यु इंग्लीश स्कुल या शाळेचे संचालक मंडळाचे अंतर्गत वाद आता टोकाला पोहचले असून संस्थेचे अध्यक्ष आबाजी पाटील यांच्या गटाचे संचालक मंडळातील दिलीप विठ्ठल महाजन व मुख्याध्यापक दिनकर श्रावण पाटील यांनी सोमवार 10 जुलै रोजी रोजी मुख्याध्यापक यांच्या दालनाला कुलूप असतांना अनधिकृतपणे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला असता उपमुख्याध्यापक एस.एल.सोनवणे यांनी त्यांना मुख्याध्यापक बी.आर.वले यांची तब्येत ठिक नसल्याने दालन उघडू देण्यास मज्जाव केला.
दोघांची उपमुख्याध्यापकांना जातीवाचक शिवीगाळ
महाजन व पाटील यांनी उपमुख्याध्यापक सोनवणे यांना जातिवाचक शिविगाळ करीत खिशातील हजार रुपये हिसकवण्याचा प्रयत्न केला व वले यांना कसे दवाखान्यात पाठविले तसे तुलाही पाठवू, अशी धमकी दिल्याचे सोनवणे यांनी आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दिलीप महाजन व दिनकर पाटील यांच्या विरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक बी.आर.वले यानांही या संस्थेचे वाद प्रकरणात मानसिक त्रासामुळे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आहे.