धुळे (योगेश जाधव) । शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होतांना दिसत आहे. मुख्य रस्त्यासह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा हैदोस वाढला आहे. जनावरे रस्त्यावर तासन तास ठिय्या मांडून बसून राहत असल्याने वाहतूक कोंडी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोकाट जनावरांकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना जीव मूठीत घेवून वाहतक करावी लागत आहे. विशेष म्हणजे मोकाट जनावरांचा महापालिका प्रवेशद्वारासमोर मुक्त संचार दिसून येतो. अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधींची वाहने येणे जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असतो . तरीही मोकाट जनावरांचा महापालिका प्रशासनाकडून बंदोबस्त केला जात नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आयुक्तांनी लक्ष द्यावे
अनेकदा जनावरे रस्त्यांवरील नागरीक, शाळकरी मुलांच्या व काहीवेळा वाहन चालकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. मोकाट जनावरे पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी राजकीय पक्ष व संघटनांकडून वेळोवेळी करण्यात येते. महापालिकेकडे मोकाट जनावरे पकडणारे पथक अस्तित्वात नाही. मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता असतांना केवळ नोटीस बजावली जाते. या गंभीर पश्न आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लक्ष घालुन सोडवण्याची अपेक्षा नागरिकांन कडून व्यक्त केली जात आहे.
संतोषी माता चौक, दत्त मंदिर चौक, समोरील रस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात, अनेकदा ही जनावरे कळपाने रस्त्यांच्या मधोमध बसलेली असतात. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो .यावर महापालिका कडून कुठलेही कारवाई केली जात नाही.
राजेश गांगुर्डे (शिक्षक )
शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे बसून राहतात यामुळे रिक्षा चालवताना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा मुख्य रस्तावर वाहतूक कोंडी होते .यामुळे अपघात होत असतात. या मोकाट जनावरांचा महापालिकेने बंदोबस्त करावा.
रविंद्र माळी (रिक्षा चालक )
वाहतुक कोंडीत वाढ
शहरातील संतोषी माता चौक ,आग्रारोड, राजवाडे बँक समोर, पारोळा चौफुली, जयहिंद चौक, दत्त मंदिर चौक, फाशीपूल, बसस्थानक परिसर अशा अनेक ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यांवर ठाणमांडून बसून राहतात. यामुळे नागरिकांना वाहतुक करण्यांसाठी तार्यावरची कसरत करावी लागते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आले आहेत. यातच सर्वत्र मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.धुळे (