धरणगाव । शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अतिक्रमणांमुळे वाहतूकदरांची कोंडी होतांना दिसून येत आहे त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणांसह इतर वाहनावर बंदी करण्याची मागणी होत आहे. भाजीपाला दुकाने, हातगाड्या, मोटारसायकल, वाहनचालक असे वाहने या ठिकाणी रस्त्यावर लागलेली असतात अशा वाहनांच्या आवाजाने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे अतिक्रम धारकांवर कायर्वाही करण्यात यावी, अशी मागणी होतांना दिसून येत आहे.
आठवडे बाजाराच्या दिवशी होते ग्रामीण भागातून गर्दी
शहरातील दर गुरूवारी आठवडे बाजार असतो या दिवशी ग्रामीण भागातून नागरिक येत असतात त्यादिवशी शिवाजी पुतळापरीसरात प्रचंड गर्दी असते. आठवडे बाजार, धरणी, कोट बाजार, बस स्टँड या ठिकाणी खूप गर्दी असते. या ठिकाणी पोलीस कर्मचारी नेमणे आवश्यक आहे, अशी मागणी जाणते कडून होत आहे. बसस्थानकाजवळ ते शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी जास्त अतिक्रमण होतांना दिसून येत आहे. या अगोदर धरणगाव नगर पालिकेने कारवाही केली असून सुद्दा तरी देखील ऍटीकरणांवर काही फरक पडलेले दिसून येत नाही. याकडे नगर पालिकेला लक्ष द्यावी, अशी मागणी नागरिकांना कडून होत आहे.