मुख कर्करोगासंबंधी माहिती संकलन

0

मुंबई । राष्ट्रीय मुख कर्करोग नोंदणी या उपक्रमात राष्ट्रीय मुख कर्करोग नोंदणी (एनओसीआर) कार्यक्रमाद्वारे देशभरातील कर्करोग-पूर्व आणि मुख कर्करोगाच्या केसेसची सर्व माहिती एकत्र एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. या सूचीच्या माध्यमातून कर्करोगजन्य आणि मौखिक कर्करोगाची राष्ट्रीय स्तरावरील रुग्णांची माहिती केंद्रीय स्तरावर प्राप्त होईल. ही सूची कर्करोगावरील माहिती व आकडेवारीचा डेटाबेस म्हणून काम करेल. देशात मौखिक कर्करोगाचे रुग्ण वाढत असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि धोरणे आखणी यांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

शासनाने मुख कर्करोगासाठी तपासणी टाटा कर्करोग रुग्णालयाच्या मदतीने करणे, हा कार्यक्रम राज्यात 1 डिसेंबरपासून सुरू केला आहे. या उपक्रमाला इंडियन डेंटल असोसिएशनचे सहकार्यही मोलाचे आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. कर्करोगाविरोधातील या लढ्याची घोषणा करतानाच आयडीएचे सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी ‘राष्ट्रीय मौखिक कर्करोग नोंदसूची’चा आरंभ केला असून, त्याद्वारे या रोगाची माहिती गरजूंना मिळणार आहे. मौखिक कर्करोगाची प्रकरणे देशात वाढत आहेत. देशातील एक दशांश प्रौढ हे तंबाखू सेवनाशी संबंधित रोगाने मृत पावत असल्याची माहिती आहे.