किन्हवली । शहापूर तालुक्यातील मुगांव येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक अण्णा शंकर विशे यांची नात प्रियंका प्रदीप विशे हिने शैक्षणिक क्षेत्रात देदीप्यमान यश मिळवून कृषी विज्ञान पदवी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या कृषी विज्ञान पदवी परीक्षेत मग्रामोन्नती मंडळ संचालित मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील ही विद्यार्थीनी शहापूर तालुक्यातील मुगांव येथील सुकन्या प्रियंका प्रदीप विशे राज्यात प्रथम आली आहे. या यशाबद्दल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने मयशवंतराव चव्हाण सुवर्ण पदकाने तिला सन्मानित करण्यात आल्याची माहिती केंद्र संयोजक बी. आर. भुजबळ यांनी दिली. शहापुरच्या किन्हवली परिसरातील मुगांव गांवच्या शेतकरी व सुशिक्षित कुटुंबातील प्रियांकाने हरभरा उत्पादन व तंत्रज्ञान या विषयावरील प्रकल्पाचे सादरीकरण केले होते.
यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक प्रमाणपत्र देऊन गौरव
तोंडीपरीक्षा व प्रकल्प सादरीकरण
या आधारे राज्यातील 553 विद्यार्थ्यांमधून प्रियंकाने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.यासाठी कृषी विज्ञान शाखेचे संचालक डॉ.सुर्या गुंजाळ यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात झालेल्या 24 व्या दीक्षांत समारंभात दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्रा.एम.जगदीशकुमार यांच्या हस्ते प्रियंका विशेला यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.यु.वायुनंद होते. ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकारीकार्यांच्या वतीनेही प्रियंका व तिचे मार्गदर्शक सूर्या गुंजाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.