मुजेत अभिनेता अरूण नलावडे यांचे व्याख्यान

0

जळगाव । मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘चौकटी बाहेरचे जग’ या व्याख्यानमालेंतर्गत ‘श्वास’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे सहनिर्माते सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते अरुण नलावडे यांचे व्याख्यान सोमवार 18 रोजी सकाळी 10.00 वाजता जुना कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आलेले आहे. श्वास, अकल्पित, पैलतीर, कायद्याचं बोला, क्षण, घात प्रतिघात, अण्णा हजारे अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. त्यासोबतच ‘का रे दुरावा ?’,’माझ्या नवर्‍याची बायको’, ‘वादळवाट’ या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तरी जळगाव शहरातील सर्व रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.