फैजपुर : चार दिवस जीव तोडून केलेली मेहनत, विविध कलागुणांचे अफाट दर्शन दिल्यानंतर युवारंगच्या निकालाने या तरुणाईच्या ‘पंढरी’ची सांगता मोठ्या जल्लोषात झाली. एकेका कलाप्रकाराचे निकाल घोषित होत असताना मोठ्या प्रमाणावर ढोल आणि ताशाच्या गजरात तसेच टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आनंद साजरा केला जात होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फैजपुर येथे युवारंग युवक महोत्सव या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात के.सी.ई. सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगावच्या संघाने सर्वोत्कृष्ट विजेतेपद पटकावले असून अमळनेरच्या खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालयाला उपविजेतेपद प्राप्त झाले. दि.19 जानेवारी पासून धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फैजपुर येथे युवारंग युवक महोत्सवाचा सोमवारी रोजी अत्यंत जल्लोषात पारितोषिक वितरण समारंभ झाला.
माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, आ.हरिभाऊ जावळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष तथा तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर, कार्याध्यक्ष दिलीप रामू पाटील, प्र.कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, परीक्षा नियंत्रक डॉ.धनजंय गुजराथी, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे, विद्यार्थी प्रतिनिधी विशाखा महाजन, धनश्री चांदोडे, दिगंबर पवार यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रा.सत्यजित साळवे यांनी प्रास्तविकात या महोत्सवात 1783 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती दिली. संघ व्यवस्थापकांच्या वतीने प्रा.योगिता पाटील (धुळे), प्रा.जुगलकिशोर दुबे (जळगाव) यांनी तर सहभागी विद्यार्थ्यांच्या वतीने सचिन देवरे (धुळे), उत्कर्षा पाटील (अमळनेर) या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य पी.आर.चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाल्याचे आपल्या भाषणात सांगितले. तसेच या वर्षापासून सांघिक उपविजेत्या संघास स्व.कुसुमताई चौधरी स्मृती प्रित्यर्थ फिरता चषक देण्यात येण्यार असल्याचे सांगितले.
दिलीप रामू पाटील यांनी चांगला माणूस घडविण्याचे हे व्यासपीठ असल्याचे सांगुन विद्यापीठात खान्देशातील लोककलेंचे संवर्धन व्हावे त्यासाठी लोककला दालन स्थापन करण्यासाठी शासनाकडून आ.जावळे यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागताध्यक्ष शिरीष चौधरी यांनी या परिसरातील तरूणाईच्या पाच दिवसांच्या सहवासामुळे आमचे आयुष्य वाढले असे सांगुन या तरूणांना निरोप देण्यास मन धजावत नाही असे सांगितले. त्यांनी लोककला अकादमीची स्थापना करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतल्यास फैजपूर येथे अकादमीचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी आम्हा पुढाकार घेवू असे आश्वस्त केले. त्यांनी चलते चलते मेरे ए गीत या गाण्याच्या काही ओळी सादर केल्या तेव्हा टाळ्यांचा एकच गजर झाला. आमदार हरिभाऊ जावळे यांनी फैजपूरच्या या पावन भूमितून प्रेरणा घेवून जाण्याचे आवाहन तरूणांना केले. यश अपयश येत असतील मात्र समाधान माना असेही त्यांनी सांगितले.
माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी तरूणाईने या महोत्सवात संयम बाळगल्यामुळे रंग भरला गेला असे मत व्यक्त करून यशाच्या जोडीला अपयश महत्वाचे असते, या महोत्सवातून मिळणारे बळ आणि आत्मविश्वास हा आयुष्यात तुम्हाला उपयोगी पडेल असा आशावाद व्यक्त केला. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी पुढील वर्षापासून युवक महोत्सवात प्रत्येक कलाप्रकारात प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्याची तसेच महाविद्यालयांना संगीत वाद्य खरेदी करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने अर्थसहाय्य करण्याची घोषणा यावेळी केली. लोककला अकादमी स्थापन करण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल असेही सांगुन त्यांनी धनाजी नाना महाविद्यालयाने हा महोत्सव यशस्वी करून दाखविल्याबद्दल आभार मानले. पुढील वर्षाचा युवा रंग युवक महोत्सव विद्यापीठात घेण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
यावेळी पाचोरा येथील डॉ.वासुदेव वले, धुळे येथील प्रा.क्रांती पाटील आणि नंदूरबार येथील प्रा.माधव कदम यांचा संघ व्यवस्थापकांचे प्रतिनिधी म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ.हर्षल पाटील, सत्यसाई मेडीकलचे डॉ.के.जी.फिरके, डॉ.उमेश चौधरी तसेच धनाजी नाना महाविद्यालयाचे कर्मचाज्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रेम तेजकर यांचा कुलगुरुंच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. पारितोषिक विजेत्यांची यादी प्रा.विलास चव्हाण यांनी वाचली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.राजश्री नेमाडे, प्रा.राजेंद्र राजपूत यांनी केले. समन्वयक डॉ.अनिल भंगाळे यांनी आभार मानले.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-
(1) संगीत विभाग
(अ) शास्त्रीय गायन- तेजस नितीन नाईक, केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), गोपाल प्रल्हाद ठाकरे, संगीत विभाग, उमवि,जळगाव (द्वितीय), रोहीणी अरूण तावडे, पु.ओ.नाहटा महाविद्यालय, भुसावळ (तृतीय)
(ब) शास्त्रीय वादन (तालवाद्य)- अजिंक्य सुनिल इनामदार, संगीत विभाग, उमवि,जळगाव (प्रथम), जय विजयकुमार सोनवणे, पु.ओ.नाहटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), सौरभ राकेश गुरव, झेड.बी.पाटील, महाविद्यालय.धुळे (तृतीय)
(क) शास्त्रीय वादन (सुरवाद्य)- युवराज वामन सोनार, राष्ट्रीय स.शि.प्र. मंडळाचे एन.वाय.चव्हाण महाविद्यालय.चाळीसगाव (प्रथम), तेजस नितीन नाईक, केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), गोपाल प्रल्हाद ठाकरे, संगीत विभाग, उमवि, जळगाव (तृतीय)
(ड) सुगम गायन (भारतीय)- गोपाल प्रल्हाद ठाकरे, संगीत विभाग, उमवि, जळगाव (प्रथम), भाग्यश्री राजू भंगाळे, पी.के.कोटेचा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), राहुल रवींद्र माळी, केसीई सोसायटीचे मु.जे. महाविद्यालय,जळगाव (तृतीय)
(इ) सुगम गायन (पाश्चात्य)- अभिषेक प्रकाश राठोड, पु.ओ.नाहटा महाविद्यालय, भुसावळ (प्रथम), अश्विनी सुरेश चव्हाण, एसएसव्हीपीएसचे वाणिज्य महाविद्यालय.धुळे (द्वितीय), समिक्षा राजेश हकीम, संगीत विभाग, उमवि, जळगाव (तृतीय)
(ई) समुहगीत (भारतीय)- खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), संगीत विभाग, उमवि.जळगाव (द्वितीय), राष्ट्रीय स.शि.प्र. मंडळाचे एन.वाय.चव्हाण महाविद्यालय.चाळीसगाव (तृतीय)
(फ) समुहगीत (पाश्चिमात्य)- पु.ओ.नाहटा महाविद्यालय, भुसावळ
(प्रथम), संगीत विभाग, उमवि,जळगाव. (द्वितीय), खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
(ग) लोकसंगीत- धुळे एज्युकेशन सोसायटीचे मा.ध पालेशा वाणिज्य महाविद्यालय,धुळे (प्रथम), राष्ट्रीय स.शि.प्र. मंडळाचे एन.वाय.चव्हाण महाविद्यालय.चाळीसगाव (द्वितीय), झेड.बी.पाटील, महाविद्यालय.धुळे (तृतीय)
(घ) भारतीय लोकगीत- आरती भागवत पाटील, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.कला, एस.एम.ए. विज्ञान व के.के.वाणिज्य महाविद्यालय.चाळीसगाव (प्रथम), धनश्री दिनेश जोशी, पु.ओ.नाहटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), श्वेता दिलीप चव्हाण, खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)
(2) नृत्यकला
(अ) समुह लोकनृत्य- खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), केसीई सोसायटीचे मु.जे. महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), पी.के.कोटेचा महाविद्यालय, भुसावळ (तृतीय)
(ब) शास्त्रीय नृत्य- चेतना नामदेव भिवसने, एस.एस.बी.टी.अभियांत्रिकी महाविद्यालय.जळगाव (प्रथम), जास्मीन प्रदिप गाजरे, केसीई सोसायटीचे मु.जे. महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), अक्षदा चारूदत्त चौधरी, पु.ओ.नाहटा महाविद्यालय.भुसावळ (तृतीय)
(3) साहित्य कला
(अ) वक्तृत्व स्पर्धा- उत्कर्षा नयन पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), पुनम सुभाष देवरे, स्व.अण्णासाहेब आर.डी.देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी (द्वितीय), गणेश चंद्रकांत सावळे, एस.एस.मणियार विधी महाविद्यालय,जळगाव (तृतीय)
(ब) वादविवाद स्पर्धा- पु.ओ.नाहटा महाविद्यालय, भुसावळ (प्रथम), झेड.बी.पाटील महाविद्यालय, धुळे (द्वितीय), शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव (तृतीय)
(क) काव्यवाचन स्पर्धा- मेघागौरी प्रमोद घोडके, खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), गोपाल राजेंद्र बागुल ,केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), नितीन देविदास पाटील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (तृतीय)
(4) नाटयकला
(अ) विडंबन नाटय- खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव (द्वितीय), धनदाई माता एज्युकेशन संचलित कला महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
(ब) मुकनाटय- झेड.बी.पाटील, महाविद्यालय.धुळे (प्रथम), केसीई सोसायटीचे मु.जे. महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), केसीई सोसायटी संचलित आय.एम.आर.जळगाव (तृतीय)
(क) मिमिक्री – सागर कैलास नाईक, केसीई सोसायटीचे मु.जे. महाविद्यालय,जळगाव (प्रथम), विजय जगदिश शिंपी डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शहादा (द्वितीय), हितेश संजयकुमार जौन, झेड.बी.पाटील, महाविद्यालय.धुळे (तृतीय)
(5) ललित कला
(अ) रांगोळी स्पर्धा- प्रग्या तुलाराम दुगर, केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम),वर्षाराणी प्रमोदचंद्र नेतकर, खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय), धनश्री बाळकृष्ण जोशी,सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,भडगाव (तृतीय)
(ब) चित्रकला स्पर्धा- पियुष प्रशांत बडगुजर, केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), सिमा सुरेश मिस्त्री, पी.के.कोटेचा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), महेंद्र मनोहर शिरसाठ, जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, फैजपूर (तृतीय)
(क) कोलाज- अंकिता विश्वास वाणी ,केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय.जळगाव (प्रथम), शुभम दिपक सोनार, खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय), स्वाती उत्तम बन्सल, ललित कला महाविद्यालय, जळगाव (तृतीय)
(ड) व्यंगचित्र- गजानन मोहन तेली, जामनेर तालुका एज्युकेशनचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय.जामनेर (प्रथम), नेहा देविदास भामरे, डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), उत्कर्षा नयन पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
(इ) क्ले मॉडेलिंग- अमोल राजधन बावणे, केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), गजानन मोहन तेली, जामनेर तालुका एज्युकेशनचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय.जामनेर (द्वितीय), प्रियदर्शनी एकनाथ भोसले, खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
(ई) स्पॉट पेटींग- सागर अशोक जंजाळकर, केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय.जळगाव (प्रथम), रितु अनिल बन्सल, ललित कला महाविद्यालय.जळगाव (द्वितीय), मुकेश विजय पंडित,एस.एस.बी.टी. चे अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी-जळगाव (तृतीय)
(फ) फोटोग्राफी- पियुष प्रशांत बडगुजर, केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), अक्षय राजेंद्र जंगले, संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय.भुसावळ (द्वितीय), रिषभ मानकलाल पाटील, डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शहादा (तृतीय)
पथसंचलन – धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर (प्रथम), पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर (द्वितीय), धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित समाजकार्य महाविद्यालय,जळगाव (तृतीय)
कलाप्रकारनिहाय विजेतेपद
(1) संगीत- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
(2) नृत्यकला- केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय, जळगाव
(3) साहित्यकला- खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय,अमळनेर
(4) नाटयकला- केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय,जळगाव
(5) ललित कला- केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय,जळगाव
सर्वोत्कृष्ट
प्रथम – केसीई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय,जळगाव
द्वितीय – खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय,अमळनेर