मुठीत जीव घेऊनओलांडावा लागतो महामार्ग

0

शिवकॉलनी पुलाजवळ भुयारी मार्गाची मागणी

जळगाव: महामार्ग चौपदरीकरण व विस्तारात शिवकॉलनी रेल्वेपुलाजवळ भुयारी मार्ग करण्याची मागणी शिव कॉलनीवासियांकडून केली जात आहे. शिव कॉलनी परिसर हा जळगाव महापालिकेमधील सर्वात मोठा प्रभाग आहे. या परिसराला लागून कोल्हे नगर, आशाबाबा नगर, भूषण कॉलनी, पोष्टल कॉलनी, हरिविठ्ठल नगर आणखी पुढे जावून विस्तारीत वाघनगरचा परीसरा पर्यंतचा भाग आहे. सुमारे 30 ते 40 हजार लोकवस्तीचा हा परिसर आहे. या परीसरातून बरेचशे, नोकरदार, कंपनी कामगार, रोजंदारी करणारे लोक, मुले शाळेत ये-जा करण्या करीता शिवकॉलनीला लागून असलेला महामार्ग ओलांडत असतात.

शिव कालनी चौकातून दररोज हजारो नागरिक महामार्ग ओलांडतात. तरी देखील या ठिकाणी वाहतुक नियंत्रक दिवे, वाहतुक पोलिस किंवा शिव कालनी व दुसर्‍या बाजूस असलेल्या गणेश कालनीच्या रस्त्याला समातंर रस्ते इतकेच काय तर साईड पट्ट्या देखील नाहीत. त्यामुळे हा महामार्ग ओलांडतान नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरश: जीव मुठीत घालून ये- जा करावी लागते. यामुळे या चौकात अनेकवेळा छोटे मोठे अपघात होत असतात. गेल्या काही वर्षात या ठिकाणी अनेक तरुणांचा अपघातात बळी गेला आहे.

गेल्या महिन्यापासून शहरातून फोर वे हायवेचे काम प्रगती पथावर असून आमच्या परिसरापर्यंत जमीन सपाटीकीरण, व मुरूम खाडी करणापर्यंत काम सुरु झालेले आहे.शहरातून जाणार्‍या या चौपदरीकरण व महामार्ग विसताराच्या प्रस्तावात कालिंका माता चौक ते खोटे नगर पर्यंत तीन ठिकाणी भुयारी मार्गाचे नियोजन आहे. यात गुजराल पेट्रोलपंप व प्रभात कालनी चौकातील भुयारी मार्गच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच शिव कालनी चौकाजवळील रेल्वे पुलाजवळून देखील भुयारी मार्ग करावा अशी मागणी मनोज भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली शिव कॉलनीतील हजारो रहीवाश्यांनी केली आहे

शिव कॉलनी पालीकाडीला गट नं. 47 हायवे कडील पूर्वेचा भाग रेल्वे पुलाजवळील उंचा वर असलेल्या भागातून एक भुयारी पादचारी मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.या भुयारी पादचारी मार्गामुळे या मोठ्या परिसराला लाभ मिळणार असून पादचारी भुयारी मार्ग पुलाजवळील भागातून काढून गणेश कॉलनी भागाकडे काढल्यास तो मार्ग थेट कोर्ट चौक पर्यंत जाण्यास चाकरमाने व शाळेतील विद्यार्थी महिला वर्ग यांच्या सुरक्षेततेच्या हिताचा राहील असेही परिसरातील नागरिकांनी म्हटले आहे. याबाबतचा अर्ज नागरिकानी खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे आणि डीआरएम भुसावळ यांना दिला आहे.