शिरपूर । तालुक्यातील मुडावद येथे दि.4 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूख्मिणी यात्रौत्सव आयोजीत करण्यात आला असून या दिवशी ह.भ.प.अशोक महाराज बुधगावकर यांचे किर्तन होणार आहे. भाविकांनी या यात्रौत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. मुडावद येथे वेदांताचार्य महंत स्वामी हंसानंदजी तीर्थ महाराज यांच्या आशिर्वादाने व ह.भ.प.दिलु तात्या यांच्या कुशल मार्गदर्शनाने आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रूख्मिणी यात्रौत्सव वर्ष 8 वे आयोजीत करण्यात आले आहे. या दिवशी अभिषेक व महापुजा पहाटे 4 वाजता ह.भ.प.रविंद्र हिरामण दोरीक यांचे हस्ते केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी 5 ते 6 यावेळेत काकड आरती होवून दर्शनाला प्रारंभ होणार आहे. दुपारी 2 वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
चहापाणी व फराळाचे वाटप
यावेळी ह.भ.प.धर्मा बारकू दोरीक यांच्या वतीने चहापाणी केवळ दोरीक, नवनीत दोरीक यांच्याकडून फराळाचे वाटप केले जाणार आहे. रात्री 8 वाजता ह.भ.प.अशोक महाराज बुधगावकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यासाठी ह.भ.प.रतिलाल सोनार व ह.भ.प.सुनिल सोनार यांच्याकडून किर्तनसेवा लाभणार आहे. या यात्रौत्सवासाठी शिवशक्ती वेल्डींग वर्क्स शॉप अँड फर्निचर यांच्यावतीने पत्रिकांचे सौजन्य लाभले आहे. येथे गेल्या 20-22 वर्षांपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन देखील केले जाते. या सप्ताहात जनजागृतीपर किर्तन होत असल्याने परिसरातील अनेकजण येथे हजेरी लावतात. एक जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर नावारूपाला येवू लागले आहे. या यात्रौत्सवाला भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. भानुदास दोरीक व ग्रामस्थांनी केले आहे.