मुतारीची तोडफोड करणार्‍यांवर कारवाई करा

0

निजामपुर । ग्रामपंचायतच्या हद्दीतील मुख्य रोडवरील दमदमा चौकातील 50 वर्ष जुनी मुतारी समाज कंटकांनी मुद्दामहून तोडफोड केली असून नागरिकांची गैरसोय होत आहे. मुतारीची तोडफोड करणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय व भ्रष्टाचार निवारण समितीतर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले. संबंधीतांवर कारवाई न केल्यास समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.