मुदतीपूर्वीच तेलंगणा सरकार होणार विसर्जित

0

तेलंगणा: मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुदत पूर्ण होण्याची आधीच विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. केसीआर यांनी यासंदर्भात राज्यपाल नरसिम्हन यांना सूचित केले आहे. या निर्णयाने आता तेलंगणाची निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकांसोबतच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा टीआरएसवरही परिणाम होण्याची चिन्हे आहे. वेगळी निवडणूक झाली, तर टीआरएस पक्षाला फायदा होईल, असा अंदाज टीआरएसचे नेते लावत आहे.

तेलंगणा राज्याचे गठण झाल्यानंतर पहिल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केसीआर यांच्या पक्षाला बहुमत मिळाले होते.