जळगाव- जिल्हा दुध संघातील संचालक मंडळाची मुदत संपली आहे. आता ते काळजीवाहु संचालक मंडळ आहे. अशा परिस्थीतीत धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. काळजीवाहु संचालक मंडळाला भरती करण्याचा कायद्यानुसार अधिकारच नाही. मग एवढी घाई का? भरती प्रक्रिया राबविण्यामागे हेतू काय? ही बाब महत्वाची आहे. कोविडमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर होत्या. मात्र आता महिनाभरात सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली.