पाचोरा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशात बेरोजगारी कमी करण्याचे स्वप्न असून मुद्रा लोन मिळणे ज्या बँकेचे अधिकारी कुचराई करतील त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. मुद्रा लोनबाबत कोणत्याही प्रकारचे बँकांना टारगेटची मर्यादा नसल्याने बँक अधिकार्यांना बँकेचे किंवा स्वत:च्या खिशातून पैसे द्यावे लागत नसून ते पंतप्रधान योजनेतून प्राप्त होतात. जळगाव जिल्ह्यात 450 कोटी रुपये कर्ज दिले. या विषयी नाराजी व्यक्त करुन खासदार ए.टी. पाटील यांनी बँक अधिकार्यांची चांगलीच कान उघाडणी केली. पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात पंतप्रधान मुद्रालोन विषयी आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत जिल्हा अधिकारी किशोर राजे निंबाळकर, आमदार किशोर पाटील, पं.स. सभापती सुभाष पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, तहसिलदार बी.ए. कापसे, जि.प.सदस्य मधुकर काटे, पद्मसिंग पाटील, रावसाहेब पाटील, नंदु सोमवंशी, युवानेते अमोल शिंदे, गटविकास अधिकारी गणेश चौदरी, पालिकेचे मुख्य अधिकारी किरण देशमुख, नायब तहसिलदार सोना मगर, राजेंद्र नजन, प.स. सदस्य ललित वाघ, बँकेचे लिडर दामलेसह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पं.स. सभापती सुभाष पाटील यांनी बँकांचे अधिकारी बेरोजगारांना मुद्रा लान देण्याचे टाळाटाळ करुन वर्षानुवर्ष ज्या खातेदारांचे बँकेत खाते आहे. अशांनाच मुद्रा लोन देत आहेत. मात्र खर्या व गरजू बेरोजगारांचे कागदपत्र न पाहताच त्यांना बँकेतून हाकलून देत आहेत. यावर खा.ए.टी. पाटील यांनी संपात व्यक्त करुन जे कोणी अधिकारी मुद्रालोन देण्यात टाळाटाळ करतील अशांची गय केली जाणार नाही. मात्र जे अधिकारी चांगले काम करतील ते अभिनंदनास पात्र ठरतील नगरदेवळा येथील सेंट्रल बँकाच्या अधिकार्यांचे आतापर्यंत केवळ दोन लाख 67 हजार रुपये कर्जाचे वितरण केले आहे. मुद्रा लोन देण्यासाठी बँकांनी स्वतंत्र कर्मचार्यांची नियुक्ती करावी कर्मचार्यांची संख्या अपूर्ण असल्यास तातडीने कर्मचार्यांची संख्या वाढविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. मात्र मुद्रालोनपासून कोणताही बेरोजगार वंचित राहिल्यास सहन करण्यात येणार नाही, असेही खासदार पाटील यांनी आढावा बैठकीत सांगितले.