मुरबाड : तालुक्यातील आदिवासी नोकरवर्ग ठाकूर, ठाकर समाज उत्कर्ष संस्था व लोकसेवा संस्था यांच्यावतीने इयत्ता 10 वी तसेच 12 वी उत्तीर्ण व इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या ठाकूर समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव अनुदानित आश्रमशाळा तळवली (बा.) येथील सभागृहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये मुरबाडमधील आदिवासी ठाकूर समाजासाठी समाजकार्य करणार्या नारायण सावळा, मालू मेंगाळ, रघुनाथ खाकर, सुधाकर वाघ यांना सन्मानित करण्यात आले. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वाती पादीर हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी आमदार दौलत दरोडा, माजी आमदार दिगंबर विशे, डॉ.पी.डी.गांडाळ, डॉ.विनोद केदारी, डॉ. सोनीया केदारी, डॉ. सदाशिव मेंगाळ, मुरबाड तालुका ठाकुर समाज संघटनेचे अध्यक्ष आदिवासी शंकर खोडका,माजी पं.स.सभापती आंबो वाघ, माजी पं.स उपसभापती भगवान भला, महाराष्ट्र राज्य नोकर वर्ग उत्कर्ष संस्थेचे राज्याचे अध्यक्ष अरुण खाकर, अनिल कवटे, विठ्ठल उघडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहन हिंदोळा यांनी केले.