मुरबाडमध्ये धूरफवारणी

0

मुरबाड : मुरबाड शहरात रोगराईला प्रतिबंध घालण्यासाठी मुरबाड नगर पंचायतचे नगराध्यक्ष किसान कथोरे यांनी तात्काळ संपूर्ण मुरबाड शहरात डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी धूरफवारणी सुरु केली आहे. तसेच गटारातील डास मारण्यासाठी लिक्विडद्वारे फवारणीचे कामही सुरु आहे. नगराध्यक्ष किसान कथोरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मुरबाड शहरात आमदार किसान कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामाचा मोठ्या प्रमाणात झपाटा लावला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुरबाड नगरपंचायतींमार्फत रस्ता रुंदीकरणाचे काम व गाळे बांधण्याचे काम जोरात सुरु आहे.