मुरबाडमध्ये लावणीची कामे अंतिम टप्प्यात

0

मुरबाड । आधुनिक युगात यंत्रावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतात फिरणार्‍या बैलाच्या नागंराची जागा आता ट्रँकरने घेतली आहे. तर काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने नांगरणी करण्यात येत आहे. मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी लावणींची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. एकेकाळी मुरबाडची झिनी ही महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. मात्र, या भातावर पडणारा खोड किडा त्या पिकाला घातक ठरत असताना कृषी विभागह त्यावर मात करण्यास अपयशी ठरला. त्यामुळे काबाड कष्ट करून पदरात काहीच पडत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी झिनीचे उत्पन्न घेण्याचे बंद केले. त्यामुळे आता मुरबाड तालुक्यातील शेतकर्‍यांचा नवनवीन पिके घेण्याकडे कल दिसून येत आहे.

प्लास्टिकचा वापर
ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची काठी आणि घोंगडी हे दुर्मीळ झाल्याने डोक्यावर घोंगडीऐवजी प्लास्टिक घेऊन शेतकरी आता नांगर हाकत आहे. तसेच यापूर्वी शेतात लावणी करणार्‍या महिलांच्या डोक्यावर वीर दिसायचे. आता मात्र, अनेक ठिकाणी प्लास्टिक पाहायला मिळत आहे.

यांत्रिक पद्धतीने शेतीची केलेली पेरणी व नांगरणी तसेच नांगराने केलेल्या पेरणीमध्ये फारच तफावत आहे. त्याचा उत्पन्नावरही मोठा परिणाम होत असल्याने बैलाने नांगरणीवर विश्‍वास ठेवून जमिनीची लागवड करतो. तसेच झिनी हे पीक खोड किड्यांना निमत्रंण देणारे ठरत आहेत. त्यामुळे हे पीक आम्हाला परवडत नाही.

-भालचंद्र वामन भोईर,
बबन गणपत मुके, शेतकरी.