मुरबाडमध्ये विद्यार्थी दिन उत्साहात साजरा

0

मुरबाड । राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांनी 7 नोव्हें. 1900 रोजी शालेय प्रवेश घेतला तो विद्यार्थी दिन म्हणून राज्य सरकारने सर्वत्र साजरा करण्याचे आव्हान केले होते त्याच धर्तीवर मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद वडवली शाळेत 7 नोव्हें. 1900 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी प्रवेश घेतला तो दिवस विद्यार्थी दिन म्हणून दि. बुद्धिस्ट सोशिअल फौंडेशन, माता भिमाई रामजी आंबेडकर स्मारक समिती वडवली, सुपरस्टार ऑल सोशिअल मीडिया वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने उत्सहात साजरा करण्यात आला.

या वेळी संदेश जाधव, अजित कदम, पद्माकर गायकवाड, बाळासाहेब भालेराव, रमेश नागवंशी, प्रा. आनंद दांडगे, शालेच्या मुख्यध्यपिका अलका बेंद्रे, लक्ष्मण पवार, गोविंद खाटेघरे, महेश पारदले, अरुण चोरघे यांच्यासह महिला प्रतिनिधी गायकवाड, शिंगोळे ताई व गावातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.