मुरबाडमध्ये शिक्षक सेनेच्या लढ्यामुळे प्राथमिक शिक्षकांना दिलासा

0

शिक्षकांच्या पाठपुराव्याला अखेर मिळाला न्याय, संघटनांच्या मोलाच्या मागदर्शनामुळेच शिक्षकांना मिळणार आर्थिक लाभ

मुरबाड – मुरबाडमध्ये सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी मुरबाड तालुक्यातील टीडीएस स्वरूपात पंचायत समिती शिक्षण विभागाने रुपये 15881106 (पंधरा लाख अठठ्याऐंशी हजार एकशे सहा) इतकी रक्कम शिक्षकांच्या पगारातून कपात केली होती. यामध्ये बर्‍याच शिक्षकांनी स्वतःच्या चलनाने भरून देखील त्यांचीही टीडीएस म्हणून रक्कम कपात केली होती. तसेच अनेक शिक्षकांचे त्यांच्या देय आकारापेक्षा अव्वाच्या सव्वा टीडीएस पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी मधुकर घोरड यांनी रक्कम कपात केली होती.

मुरबाडमधील 222 शिक्षकांना मिळणार दिलासा
टीडीएस कपात करणे गैर नसले तरीही ही प्रक्रिया काळजी घेऊन नियमाप्रमाणे करणे गरजेचे असते. याच बरोबर आयकर विभागाच्या नियमानुसार शिक्षकांना त्यांच्या कपात टीडीएसचे 16 नंबर फॉर्म आयकराच्या कपात कर्त्याला देणे बंधनकारक असते. शिवाय 31 जुलै 2017 च्या आत त्या कपात रकमेचे टीडीएस रिटर्न फाईल कपात कर्त्याला देणे बंधनकारक असते. मात्र या बाबत मुरबाड शिक्षक सेनेने सुरुवातीपासून (एप्रिल 2017) ही मागणी अभ्यास पूर्ण रित्या सातत्याने लावून धरली. मात्र सुरुवातीलाच चालढकल करणार्‍या गट शिक्षण अधिकारी घोरड यांची भेट घेऊन सदरचे काम पूर्ण करण्याची मागणी केली व तसे संघटनेचे पत्रही दिले.

शिक्षकांमध्ये आनंद
याबाबत गटविकास अधिकारी हाश्मी यांना देखील सादर विषयाची कल्पना दिली होती. शेवटी हे काम कल्याण च्या एका सीएकडून करून शिक्षकांना टीडीएस रिटर्न फाईल देणे मुरबाड गट शिक्षण अधिकारी यांना भाग पाडले. यामुळे मुरबाडमधील अनेक शिक्षकांनी शिक्षक
सेनेचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

शिक्षक सेनेचे हे यश
शिक्षक सेनेचे हे यश महत्त्वपूर्ण असून यामध्ये शिक्षक सेना मुरबाड तालुका अध्यक्ष शाम पाठक, उपाध्यक्ष विजय राठोड व सरचिटणीस राजकुमार पाटील तसेच सर्व शिक्षक सेना मुरबाड तालुका पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभल्याने वरील 222 शिक्षकांना दिलासा मिळाला.