मुरबाड (बाळासाहेब भालेराव) : मुरबाड तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी मुरबाड पोलीस हद्दीतील व टोकावडे पोलीस हद्दीतील एकूण २९ सार्वजनिक मंडळे गणेश उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. तर तालुक्यात मुरबाड व टोकावडे पोलीस ठाणे मिळून जवळपास २९४९ गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी गणेश उत्सवमंडळाचे सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र डी जे लावणाऱ्या व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या विरोधात पोलीस कडक कारवाई करणार असल्याने हजारो गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे. तसेच यंदा श्री गणरायाचे स्वागत ढोल ताशाने होणार होणार कि काय ? तसेच लाखो रुपयाने खरेदी केलेले डी जे साहित्य वाजवणाऱ्यांवर यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
तालुक्यातील सरळगाव, टोकावडे, धसई, म्हसा व मुरबाड शहर या प्रमुख बाजारपेठ येथे गणेश उत्सवाच्या लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्याची लगबग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मात्र २ दिवसापूर्वी पावसाची रिमझिम चालू असल्यामुळे खरेदीला निघालेल्या खरेदीदारांना व ग्राहकांना मोठी अडचण होत होती. परंतु वरून राजाने गणेश भक्तांवर पाऊस थांबवण्याची कृपा करून चांगली उघड दिल्याने खरेदी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड उडालेली आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यात यंदा गणेश उत्सवासाठी मुरबाड पोलीस ठाणे व टोकावडे पोलीस ठाणे येथे संबंधित अधिकाऱ्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यां सोबत मिटिंग घेऊन त्यांना धार्मिक सनाबाबत शांतता पाळण्याचे व डी जे न लावणे व ध्वनी प्रदूषण बाबत सतर्कतेच्या इशारा देऊन सूचना दिलेल्या आहेत
मुरबाड पोलीस ठाणे हद्दीत
सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची संख्या १३
खाजगी गणपतींची संख्या १८००
यासाठी कडक चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
अजय वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुरबाड
टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची संख्या १६
खाजगी गणपतींची संख्या ११२०, यासाठी कडक चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
– धनाजी पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, टोकावडे