मुरबाडात कोरावळ्यात धूरफवारणी

0

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील कोरावळे ग्रामपंचायतमार्फत गेली चार वर्षे पावसाळ्यामध्ये सतत चार वेळा गावामध्ये कोणत्याही प्रकारची रोगराई व डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धूर फवारणी करण्यात येते. हे काम ग्रामसेवक सचिन घुडे हे सातत्याने लक्ष देऊन करत आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार बाळासाहेब भालेराव ज्या दिवसापासून ग्रामपंचायतचे सदस्य झाले आहेत. ते आजतागायत ग्रामपंचायतीची विविध कामे करून एक चांगल्या प्रकारे विकासाचा आदर्श उमटवत आहेत. त्यामध्ये रस्त्याची कामे, गावात ट्रान्सफॉर्मर बसविणे, वेळोवेळी लोंबकळलेल्या विद्युत तारा या संदर्भात महावितरणला तक्रारी करणे त्यातून गाव पातळीवर तात्काळ पोल बसविणे, कंडक्टर बदलणे या प्रमुख कामांसह अनेक कामे चार वर्षात ग्रामपंचायत सदस्य म्हणून व पत्रकार या नात्याने मार्गी लावली आहेत. त्यामुळे तालुक्याने सुद्धा कोरवाले ग्राम पंचायतीचा आदर्श घ्यावा अशी वाटचाल सध्या ग्रामपंचायतीची सुरु आहे अशी प्रतिक्रिया कोरावळेचे माजी सरपंच व शिवसेनेचे सरळगाव विभागप्रमुख पांडुरंग धुमाळ यांनी दिली आहे.