मुरबाडात पुरस्कार सोहळा

0

मुरबाड। मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या 772 नामांकित कॉलेजमधून व्ही.ई.एस कॉलेज ऑफ फार्मेसीचे प्राचार्य डॉ.सुप्रिया शिधये यांना नुकताच पहिला सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या 8 वर्षांपासून सुप्रिया शिधये या व्ही.ई.एस कॉलेज ऑफ फार्मेसी चेंबूर, मुंबईच्या प्राचार्य आहेत. 24 वर्षांहून अधिक कालावधीपासून त्या शिक्षण क्षेत्रात आहेत. त्यांनी फार्मेसीमध्ये विशेषज्ञ आहेत. शिधये यांनी फार्मेसीमध्ये केलेले संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात त्यांच्या योगदानामुळे या पुरस्कारासाठी निवड केली.