मुरबाड : तालुक्यातील पार पडलेल्या क्रुषी उत्पन्न बाजार समीतीचे निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना यांना बहुमत मिळाल्याने आज झालेल्या सभापती व उपसभापती निवडणूकीत राष्ट्रवादीचे रमाकांत सासे यांची सभापती व प्रकाश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.हि निवडणुक प्रक्रिया बाळ परब प्राधिक्रुत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खालापुर व सुरेश अधिकारीउपलेखा परिक्षक सहाय्यक अधिकारी यांनी पार पाडली. या वेळी माजी आमदार गोटीराम पवार. शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे.टि.डी.सी.चे संचालक सुभाष.पवार खंडूदादा मोरे. विधानसभा संघटक आप्पा घुडे.उप तालुका प्रमुख बाळा चौधरी.यांच्यासह राष्ट्रवादी,शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
वार्षिक सुमारे चाळीस कोटीची उलाढाल आसलेल्या क्रुषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपचे आमदार किसन कथोरे व भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी मोठ्या ताकदीने या निवडणुकीत सहभाग घेतल्याने भाजपला कोणत्याही प्रकारे या बाजार समितीवर विराजमान होऊ द्यायचे नाही यासाठी राष्ट्रवादीने भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील एका गटा बरोबर युती करुन बाजार समितीचे अठरि जागापैकी तेरा जागावर बहुमत सिध्द करुन बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यास यशस्वी झाली.
या बाजार समितीवर सभापती पदी कोणाची वर्णी लागेल यासाठी महिनाभर चर्चेला उधाण आले असताना आज क्रांती दिनाचे औचित्य साधुन झालेल्या सभापतीचे निवडणुकीत शेतकरी संघाचे माजी चेअरमन रमाकांत सासे.यांची राष्ट्रवादी व उपसभापती पदी शिवसेनेचे प्रकाश पवार यांची.बिनविरोध निवड करण्यात आल्याने राष्ट्रवादी शिवसेनने एकत्र येऊन मुरबाड मध्ये सत्ता परिवर्तन केले असुन हि युती कायम राहिल्यास आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठी रंगत पहावयास मिळणार आहे.