मुरलीकुमार ठरला महापौर चषक भारत श्री 2018 चा मानकरी

0

महाराष्ट्र संघाला सांघिक विजेतेपद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘महापौर भारत श्री 2018’ या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये ‘पिंपरी चिंचवड महापौर चषक भारत श्री 2018’चा किताब इंडियन बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशनच्या मुरलीकुमार याने चॅम्पियन ऑफ चॅम्नियनचा किताब पटकाविला. पुरुष गटात जम्मु-काश्मिरचा राजकुमार सर्वसाधारण विजेता ठरला. तर या स्पर्धेत महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळाले. माजी महापौर संजोग वाघेरे पाटील महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव भारत श्री 2018 या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ चिखली जाधववाडी येथे शनिवारी पार पडला.

या स्पर्धेचे आयोजन इंडियन बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशन यांच्या मान्यतेने पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभाग, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या व पिंपरी-चिंचवड अ‍ॅमेच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. बक्षिस वितरण समारंभाला आमदार महेश लांडगे, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, आयबीबीएफएफचे सचिव डॉ. संजय मोरे, अभिनेता सिध्दांत मोरे, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव राजेंद्र सातपुरकर, खजिनदार राजेश सावंत, पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, नगरसेविका अश्‍विनी जाधव, राहुल जाधव, वसंत बोराटे, नितीन बोर्‍हाडे, उद्योजक कार्तिक लांडगे, सुभाष जाधव, संयोजक संतोष जाधव, सागर हिंगणे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर आदी उपस्थित होते.

खेळाडूंसाठी विविध योजना
आमदार महेश लांडगे म्हणाले की, महापालिकेच्यावतीने खेळाडूंसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आपल्याला बाकी गोष्टी सहज मिळतात. त्यामुळे खेळावर लक्ष दिले पाहिजे. स्पर्धेत ‘आयबीबीएफएफ’च्या आवाश खान याला बेस्ट पोझर तर महाराष्ट्राच्या दिनेश कांबळे याला मोस्ट इम्प्रूव्हड किताबाने गौरविण्यात आले. सांघिक गटात दिल्लीचा संघ उपविजेता ठरला.

स्पर्धेचे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे निकाल पुढीलप्रमाणे.
55 किलो : अरुण दास (आयबीबीएफएफ), माहेश्‍वर साहू (ओडिसा), जहीर अहमद (महाराष्ट्र); 60 किलो : पी. संतोष कुमार (कर्नाटक), अंकीत सैनी (दिल्ली), जगेश दाईत (महाराष्ट्र); 65 किलो : स्वप्नील नरवारकर (आयबीबीएफएफ), कमल गोस्वामी (दिल्ली), किरण शिंदे (महाराष्ट्र); 70 किलो : दिनेश कांबळे (महाराष्ट्र), महेश नेगी (दिल्ली), आशिष माने (महाराष्ट्र); 75 किलो : एस. पद्मनाथम (आयबीबीएफएफ), सुमन दास (प. बंगाल), मनजित सोखी (दिल्ली); 80 किलो : राजेश अरले (महाराष्ट्र), संजय सैनी (हरियाना), अर्जिक्य रेडेकर (महाराष्ट्र); 85 किलो : विघ्नेश डी (आयबीबीएफएफ), प्रमोद सिंग (महाराष्ट्र), शाबिद व्ही.पी. (केरळ); 90 किलो : अवास खान (आयबीबीएफएफ), किरत पाल सिंग (पंजाब), हरमीत सिंग (महाराष्ट्र); 100 किलो : मुरली कुमार (आयबीबीएफएफ), प्रवीण कुमार (उत्तर प्रदेश), अभिजित दास (आसाम); 100 किलो पुढील : विनय कुमार (दिल्ली), अनीश, हरिप्रसाद (दोघेही आयबीबीएफएफ); पुरुष फिजिक (170 सीएम) : रावेश प्रधान (गोरखालँड), वरुण मल्होत्रा (दिल्ली), निखिल मकवाना (हरियाना); पुरुष फिजिक (170 सीएम): राज कुमार (जम्मू – काश्मीर), अर्जुन सिंग (दिल्ली), प्रवीण कुमार (हरियाना); वुमेन्स फिजिक (खुला गट) : डॉ. मृदूला (दिल्ली), करिश्मा अरोरा (दिल्ली), करुणा वाघमारे (महाराष्ट्र); वुमेन्स फिजिक (खुला गट) : निशा भोयर (छत्तीसगड), करिश्मा पारिख (गोवा), अनन्या रॉय (पश्मिच बंगाल); पुरुष क्लासिक (खुला गट) : किसन तिवारी (विदर्भ), संगीत नाथ (पं. बंगाल), महम्मद (उत्तर प्रदेश) या सर्वांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी गुणवंत खेळाडू गिरीजा लांडगे, विराज लांडगे, योगेश जाधव, प्रसाद सस्ते, बापू शिंदे, पुजा शेलार, विकी बनकर, तेजस बटवाल, शुभदा लोखंडे, पृथ्वीराज इंगळे, विक्रांत लांडगे, युवराज आल्हाट, प्रणव लोंढे, अमिश्री राजपूत आदींचा सत्कार करण्यात आला.