धर्मशाळा । ऑस्ट्रेलिया संघाचा भारतीय दौरा अनेक कारणांनी गाजला आहे.त्यामध्ये प्रमुख कारण होते ‘स्लेजिंग ‘ यात कांगारूकडून अनेक दिग्गंजांनी उडी घेतली होती.मात्र चौथ्या कसोटीच्या तिसर्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात कर्णधार स्टीव्ह स्मिथ मुरली विजयला शिवीगाळ करतांना दिसत होता.पराभवानंतर स्मिथने मुरली विजयाची माफी मागितली. तिसर्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात कर्णधार स्टीव्ह स्मिथ एका व्हिडिओत भारतीय खेळाडू मुरली विजयला शिवीगाळ करीत असल्याचा दिसत होता. त्यानंतर सोशल मीडियावर स्टीव्ह स्मिथवर चांगलीच टीका करण्यात आली होती. भारताकडून पराभव झाल्यानंतर मीडियांशी बोलताना स्मिथ म्हणाला, ’मी रागाच्या भरात भावनांवर ताबा ठेऊ शकलो नाही. त्यासाठी मी माफी मागतो. मी पूर्ण मालिकेदरम्यान तणावात होतो, तसेच संघासाठी चांगला खेळ करण्यासाठी प्रयत्नशील होतो.