मुरुड समुद्रात जय मल्हार बोट बुडाली

0

नांदगाव: शासनाने 1 ऑगस्टपासून मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार रविवारी सकाळी मुरुड शहरातील अरपेश जंजिरकर यांच्या मालकीची बोट आयएनडी एमएच 3 एम एम 1196 जय मल्हार ही बोट मुरुड समुद्रकिनार्यापासून दिडकिलोमिटर अंतरावर मच्छी पकडण्यासाठी समुद्रात गेले असताना जोराच्या लाटा येऊन बोटीवर आदळल्याने बोट बुडाली. बोटीमधील अमोल जंजिरकर, अरपेश जंजिरकर, भालचंद्र मकु, नितिन केंडू, नरेश वाघरे, नकेश पावसे, बाळू पाटील, ललित आगलावे, बाळकुष्ण आगलावे या सर्व खलाशांनी समुद्रात उडी मारुन किनारी आले. मात्र तोपर्यत ती बोट समुद्रात पुर्णता बुडाली होती. सर्व कोळी बांधव व येथील असणारे भंडारी समाजाचे बांधवानी सर्व एकत्र येऊन दोरखंडाच्या साहय्याने ती बोट बाहेर काढली.

खाडीमध्य गाळ असल्याने नौका चालविणे अवघड
ओहटी असल्याने तसेच खाडीमध्ये प्रचंड गाळ असल्याने मच्छीमारांना नौका खाडीतून चालविणे अवघड झाले आहे. ही बोट काढण्यासाठी नगरसेवक विजय पाटील यांनी विशष मदत कार्य केले. तसेच एकदरा गावातील कोळीबांधव, मुरुड शहरातील भंडारी वकोळी बांधव, सागर कन्या मच्छीमार सोसायटी, जय भवानी मच्छीमार सोसयटीचे सर्व कोळी बांधव यांनी सहकार्य केले. सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले व मनोहर मकु यांनी ग्रोयंस बंधरा बांधण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडे अनेक निवेदन देण्यात आली.