मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांची माहिती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चर्होली परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुमाची चोरी केली जात आहे. या मुरुम चोरीचा दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी संबंधितांना दिले आहेत. त्यावर जिल्हाधिकार्यांनी मुरुम चोरी प्रकरणाचा दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले असल्याचे, मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले. या शिष्टमंडळात भोसरी विधानसभा मतदार संघाचे मनसेचे अध्यक्ष अंकुश तापकीर, रूपाली गिलबीले, तुषार बवले, दोपाडीचे प्रभागध्यक्ष ऐलेक्स आप्पा, सुधीर जम, निलेश पवार आदींचा समावेश होता.
मोठ्या प्रमाणात मुरुमाची चोरी
चर्होली परिसरातून गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मुरुमाची चोरी केली जात आहे. याकडे कोणीही लक्ष्य देत नाही. त्यामुळे मुरुम चोरांचे फावले आहे. मोठ्या प्रमाणात खोदाई केली जात आहे. खोदून मुरुम चोरुन नेला जात आहे. त्यामुळे या मुरुम चोरी प्रकरणात लक्ष घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली. जिल्हाधिकरी राम यांना ÷चर्होली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मुरुम चोरी होत असून संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.